या पुस्तकाविषयी
पु. शि. रेगेंनी 'काव्याचे जीवनातील स्थान' ह्याविषयी चिंतन केले आहे, त्यामध्ये काही गोष्टींचा हा असा विचार केलेला आढळतो 'यांत्रिक युगाने व्यक्तीच्या जीवनाचा बहुतेक भाग असा व्यापून टाकला आहे की, स्वतःच्या भावनांची आपणांस लाज वाटते. आपल्याला निराळेपणा नको असतो. आचार-विचारांत व पोशाखात, जीवनातील सर्व अंगांत, इतरांसारखे असणे भूषणावह वाटते व त्याप्रमाणे राहण्याचा आपण प्रयत्न करतो. सामाजिक जडजीवनाचा आपल्यावर इतका परिणाम झालेला असतो की, त्यातून आपले व्यक्तित्व क्वचितच प्रभावीपणाने बाहेर उमटून दिसते.' पूर्वसूरींच्या भ्रष्ट नकलाकारांच्या व हेच चलनी नाणे सिद्ध झाल्याने एकमेकांच्या नकला उतरवून कवितेला एकसुरी करून टाकलेल्या ह्या हुच्च दिवसांत राहुल पुंगलिया आपले स्वत्व आणि सत्त्व घेऊन दमदारपणे पाऊल रोवतो आहे हे खूपच आश्वासक आणि खऱ्या काव्यरसिकांकरिता सुखावह आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.