या पुस्तकाविषयी
आपल्याला भाजून काढणाऱ्या सूर्याच्या उन्हाचे चंद्राने सुखद चांदणे करून आपल्याला द्यावे तसे हेमंत गोविंद जोगळेकर आपल्या दुःखाची कविता करतात. त्यांच्या या 'तू' नुरल्यावर 'उरलेल्या आयुष्यात' चिरविरहाचा अंतःस्वर भरून राहिलेला आहे. कुठेही आक्रस्ताळी न होता, ही कविता दुःखाचा समंजस स्वीकार करते. सर्वांची होते. कधी 'तू' कडून 'ती' कडे जाते. 'ती' मध्ये शिरते. कधी ही 'ती' कविताच होते. कुठल्याही परिस्थितीत, हेमंत गोविंद जोगळेकरांच्या कवितेतील अंगभूत निरागसता लोपत नाही. अशी कविता मराठीत तरी अनन्यसाधारण आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.