वाचे बरवें कवित्व

Vache Barave Kavitva

लेखक S. M. Kanadje
प्रकाशक
Lalit Publication
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
१४३
ISBN
978-81-977284-6-4
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

स्वतःलाच रचीत आणि घडवीत वाटचाल करणारा नारायण सुर्वे यांच्या कवितेतील नायक एक जागृत आणि तत्पर ध्येयपथिक आहे. तो आपले सत्त्व आणि स्वत्व याची जाणीवपूर्वक जोपासना करतो. त्याचे व्यक्तित्व तेजस्वी आणि ओजस्वी आहे. त्यांच्या जाणिवा सतेज आणि धारदार आहेत. त्याची जीवनदृष्टी पीळदार, सकारात्मक आणि आशावादी आहे. तो देवाधर्माच्या नावाखाली विकारवश होणाऱ्या माणसांच्या कळपात हंबरत हिंडत नाही. कारण तो स्वतंत्र विचाराचा असून आत्मप्रत्ययाशी प्रामाणिक आहे. त्याला 'माणूस'पणाचे भान आहे, तो स्वतःला रचण्याची भाषा करतो. त्याचा आपल्या कर्तृत्वावर विश्वास आहे.

केवळ जगणे हे त्याचे प्रयोजन नाही, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे शिल्प घडविणे हा त्याचा ध्यास आहे. स्वतःला रचणे हे तो आपले जीवनमूल्य मानतो, 'आत्मसन्मानाने जगणे' यातच त्याला जीवितसाफल्य वाटते. 'स्वतःला रचीत गेलो' हे पालुपद आळवणारा हा नायक प्रतिकूल परिस्थितीत तावून सुलाखून निघाला आहे. देवावर न विसंबणे, कुणापुढेही न झुकणे, जिद्दीने जगणे, उमेदीने वागणे, आत्मसन्मानाची जाणीवपूर्वक जोपासना करणे आणि स्वतःच स्वतःचा भाग्यविधाता होणे, हा त्याचा जाहीरनामा आहे.

वाचे बरवें कवित्व काव्य समीक्षा एस. एम. कानडजे

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like