Description

“आज सगळीकडे जागतिकीकरणाची चर्चा आहे. पण जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय ? ज्या अर्थी ते ‘करण’ आहे, त्या अर्थी ते कुणी तरी करतंय. कोण करतंय हे जागतिकीकरण? कशासाठी? कोणासाठी ? ज्या अर्थी ते जागतिक आहे असं सांगितलं जातंय, त्या अर्थी ती एक सार्वभौम म्हणजेच सगळ्या पृथ्वीला व्यापणारी प्रक्रिया असणार. तिचे परिणाम सर्व जगाला ग्रासणार. जरी हे परिणाम सर्वत्र एकाच प्रकारचे असतील अशी ग्वाही देता आली नाही तरी ते जगभर या ना त्या प्रकारे सर्वांना जाणवणारच. ह्या प्रक्रियेची सुरुवात कोणी केली, कधी केली ? तिला कोणाचा पाठिंबा आहे? तिला कोणाचा विरोध आहे? ती सबंध मानवजातीच्या हिताची प्रक्रिया आहे की त्या प्रक्रियेत माणसांपैकी जी हजारो कोटी दुबळी माणसे आहेत, ती भरडली जाणार आहेत? आणि दुबळी माणसं अखेर भरडली जाऊन नष्ट होण्याच्या लायकीचीच आहेत असं सांगणारं तत्त्वज्ञान किंवा विचार प्रणाली मांडण्याचा हा प्रकार आहे काय?”