Availability: In Stock

Pratyaya Ani Vyatyaya | प्रत्यय आणि व्यत्यय

180.00

Publication Date: 11/8/2009

Pages: 103

Language: Marathi

Description

“मार्क्सचं एक वाक्य आहे की, हे जग बदलण्याची आवश्यकता आहे. आणि तत्त्वज्ञान असो, कला असो, किंवा काहीही असो, कोणत्याही निर्मितीची दिशा, हा जो आवश्यक बदल आहे, तो घडविण्याच्या दिशेने असली पाहिजे. म्हणजे निर्मितीची दिशा ही तारक असली पाहिजे, ती मारक नसली पाहिजे. हे एक सूत्र पकडून त्याचं एका निराळ्या पातळीवर पुनरुज्जीवन करावं लागेल. त्याच्यावर अत्यंत निराळ्या पातळीवर भाष्य करावं लागेल. मार्क्सला एकोणीसाव्या शतकामध्ये पुष्कळ गोष्टी उपलब्ध नव्हत्या. मार्क्सचे काही भविष्यदर्शक आडाखे चुकले. त्याच्यावर आधारलेले लोकांचे आडाखे चुकले. पण त्याने मांडलेली जी मूळ समस्या आहे, आणि तिचं त्याने मांडलेलं जे स्वरूप आहे, ते आजच्या वैज्ञानिक माहितीच्या संदर्भात ज्ञानाच्या संदर्भात जैविक तगमगींच्या संदर्भात परत मांडणं आवश्यक आहे. लढाऊपणा जपणं आवश्यक आहे. एक आत्मसंरक्षणाची गरज कलेमध्ये जपणं आवश्यक आहे. ही टिकण्यासाठीची लढाई आहे, आणि कलेत तिचा स्वर जपणं गरजेचं आहे. हे आत्मसंरक्षणाचं सूत्र, हा विचार परत कुठंतरी रुजावा असं मला वाटतं. तो रुजला, की एका पिढीला सबंध नवी दिशा मिळू शकते. प्रत्येकजण आपापल्या पध्दतीनं लिहिणार, पण त्याच्या लिहिण्याची कसोटी त्याच्या तारकत्वावर किंवा मारकत्वावर लागेल. काफ्कासारखा मनुष्य सुध्दा आपल्याला जगवतो कारण की जे विश्व तो पाहतो, तो बाकीच्या सगळ्यांना पडलेल्या स्वप्नांवरचा उतारा असतो. ”