Description
जगांतील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पहातां, हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळ्या शूद्र शेतकऱ्यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट अवस्थेस पात्र होऊन केवळ पशूपलीकडचे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल.
हा ग्रंथ अनेक इंग्लिश, संस्कृत व प्राकृत ग्रंथ व हल्लीचे अज्ञानी शूद्रादी अतिशूद्रांच्या दीनवाण्या स्थितीवरून रचिला आहे, हे सांगण्यास नको.