Description

शंकर विभुते यांनी ‘कंट्रोल युनिट’ या त्यांच्या कादंबरीत आपल्या निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची गोष्ट मोठ्या . बहारीने आणि अनेक बारकाव्यांसकट फार अधिकृतपणे सांगितली आहे. ही एवढी अशीच गोष्ट त्यांनी सांगितली .. असती तर ती एका अनुभवाच्या निवेदनाच्या पातळीवर राहिली असती. त्यांनी तसे केलेले नसल्यानेच तिचे कथानक ‘कादंबरीच्या पातळीवर गेले आहे.
त्यांनी काय केले आहे ? एका सामान्य आणि संवेदनशील प्राध्यापकाला त्याच्या ध्यानीमनी नसताना एका मतदान केंद्राचा अध्यक्ष म्हणून काम करावे लागते. त्या निमित्ताने त्याला येणारे अनुभव या कथानकाच्या केन्द्रस्थानी आहेत. पण ते तेवढेच नाही. या निमित्ताने आपली लोकशाही व्यवस्था, जातीव्यवस्था, जातीयता, निवडणूक प्रक्रिया; त्यांच्याविषयीचे आपले वैयक्तिक आणि सामूहिक आकलन यांची चित्रदर्शी मांडणी या कथानकात येते. एका प्रकारे आपल्या समाजव्यवस्थेचे एक सबाल्टर्न (subaltern ) आकलन विविध अंगांनी आपल्यासमोर उभे होते. सबाल्टर्न म्हणजे सामान्य माणसाच्या नजरेतले. आपल्याला आपला काळ थेट पाहण्यासाठी असा आरसा उभा राहतो. हा subaltern mirror निर्माण करणे हे या कादंबरीचे महत्त्वाचे यश आहे.

Additional information

Book Author