Description
साहित्याचे प्रवाह आणि प्रकार मूलभूत तत्त्वांसह आकाराला येत असतात. साहित्यकृतींच्या संहितेमध्येच संरचनात्मक घटक अंतर्भूत असतात. हे सर्व घटक विशिष्ट भूमिकेतून समजून घ्यावे लागतात. म्हणजेच साहित्यकृतींच्या प्रत्यक्ष आस्वादापूर्वी त्यामागचे सैद्धांतिक प्रयोजन अभ्यासणे आवश्यक ठरते. साहित्याचे प्रवाह आणि प्रकार मानले नाहीत तर साहित्यकृतींची रचना, वैशिष्ट्ये, स्वरूप, संकल्पना, परंपरा इत्यादी बाबी अभ्यासता येणार नाहीत. कारण एखादी साहित्यकृती वाचताना वाचक कोणत्या प्रवाहातील आहे, कोणत्या प्रकारातील आहे हे लक्षात येऊन ती वाचत असतो. म्हणजेच साहित्याचे प्रवाह आणि प्रकार यांचे भान ठेवूनच वाचक वाचनकार्य करतो असे म्हणता येते. सैद्धांतिक चर्चा आणि साहित्यकृतींची चिकित्सा हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रस्तुत संपादित ग्रंथाची मांडणी केली आहे.