Description

या पुस्तकात तीन प्रकारचं लेखन आहे. एक : काव्य समीक्षा; दोन : भाषांतरित कविता आणि त्यांच्यावरलं सूचक भाष्य (आधुनिक कवितेला सात छेद), कवी काय काम करतो; तीन : काही समकालीन लेखकांच्या संवेदन- स्वभावावरील आणि वाड़मयीन संस्कृतीवरील भाष्य. हे लेखन संकलित स्वरुपात वाचत असताना असं जाणवलं की, ते २५-३० वर्षापूर्वीच पुस्तकस्वरुपात यायला हवं होतं. अभ्यासकांच्या हाती जायला हवं होतं, विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात, संदर्भयादीत येणं गरजेचं होतं. म्हणजे कवितेच्या आणि एकंदरच साहित्याच्या आकलनाच्या, नव्या दिशांचा परिचय त्यावेळी झाला असता. एक असांकेतिक अभिरुचीसंपन्न वाचक वर्ग निर्माण झाला असता. या वाचक वर्गाच्या सर्जक उद्देशांमध्ये विविधता आली असती. आणि लेखांच्या वाड़मयीन, न-नैतिक सांस्कृतिक संवेदन स्वभावाला प्रेरक ठरली असती. याचा अर्थ आज या लेखनाचं महत्त्व कमी झालं आहे असं नाही. उलट ते अधिक वाढलं आहे. कारण साहित्य व्यवहारातील पारदर्शकता क्रमानं कमी होताना दिसते आहे. या स्थितीला मार्गदर्शक उत्तर चित्रे यांच्या या लेखनातून मिळेल असं वाटतं.