Availability: In Stock

Sahityabandh | साहित्यबंध

350.00

ISBN – 9788194417637

Publication Date – 05/12/2019

Pages – 236

Language – Marathi

Description

ॲरिस्टॉटल या विचारवंताने साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले आहे. ॲरिस्टॉटलच्या या विधानाची प्रचिती ‘साहित्यबंध’ हे पुस्तक वाचताना येते. आजच्या जागतिकीकरणातही वाङ्मयनिष्ठा जोपासणाऱ्या व वृद्धिंगत करणाऱ्या लेखकांत वाढ होत आहे. या लेखकांजवळ असणारे साहित्याविषयीचे आत्मभान अचंबित करणारे आहे. वर्तमानातल्या प्रश्नांना भिडण्याचे व या प्रश्नांचे सखोल चिंतन करणारे लेखनबळ त्यांच्या कलाकृतीतून जाणवते. सामाजिक मूल्यभान अधोरेखित करून मानवी जगण्याचा शोध घेण्याचं काम ही लेखक मंडळी करताना दिसून येतात. मानवी भाव-भावनांचे विविध पैलू व जगण्यातील नैतिकता हरवू न देणाऱ्या या लेखकांच्या कलाकृतीची आशयघन चर्चा व साहित्य चिंतन डॉ. सतीश कामत यांच्या ‘साहित्यबंध’ या पुस्तकात अनुभवता येते. नाटक, कथा, कविता, प्रवासवर्णन या वाङ्मय प्रकारांची संरचना, घटक आणि वैशिष्ट्याची मांडणी ‘साहित्यबंध’ मध्ये आहे. हा ‘साहित्यबंध’ वाचणाऱ्यांना व लिहिणाऱ्यांना अधिक जवळ आणेल, यात शंका नाही.- डॉ. धनाजी गुरव

Additional information

Book Editor

Dr.Satish Kamat | डॉ.सतीश कामत