Description
नव्या युगाचे महाकाव्य जर लिहिले गेले तर ते आता कादंबरीतून लिहिले जाईल हे ‘वॉर अँड पीस’सारख्या महान कादंबरीतून सिद्ध केले गेले. कादंबरी या साहित्यप्रकाराची ताकद आणि आवाका यावरून लक्षात यावा. डी. एच. लॉरेन्ससारखा कादंबरीकार तर ‘आपण कादंबरीकार आहोत आणि कादंबरीकार म्हणून आपण साधू, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत’ असे अभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगाला बजावून सांगतो. लॉरेन्सप्रमाणेच अभिमान आणि आत्मविश्वास उराशी बाळगून साकल्याच्या प्रदेशात उतरणाऱ्या आणि मानवी मनाचा तळठाव घेणाऱ्या प्रगल्भ प्रतिभावंतांकडूनच अर्थपूर्ण निर्मितीची अपेक्षा ठेवता येते. अशा लेखकांकडून मराठी कादंबरीतील मरगळ घालवली जाईल आणि ती अधिक जीवनाभिमुख होईल, अशी अपेक्षा ठेवूया. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी प्रवृत्ती आणि प्रवाह’ या लेखामधून)