ईश्वर मृतात्म्यास शांती देवो

Ishwar Mrutatymyas Shanti Devo

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
१९९६
पृष्ठे
१४४
ISBN
9799380617007
भाषा
मराठी

₹२७५

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

नगर - महानगर, निमशहर-खेडे या सगळ्यांना पोटात घेऊन माणसाचा निखळ शोध हे रंगनाथ पठारे यांच्या कथेचे मूलभूत- वैशिष्ट्य ! त्यामुळे जगण्याच्या मूलभूत प्रेरणांचा अखंड शोध त्यांच्या कथांतून प्रत्ययाला येतो. जात-धर्म-पंथ यातून माणसाच्या जगण्यात निर्माण होणाऱ्या तणावांचे चित्रण करता करता वृत्ती प्रवृत्तींच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत, जगण्याचा तळ गाठण्याची आकांक्षा त्यांची कथा बाळगते. आशयसूत्रांची व्यामिश्रता आणि गंभीर जीवनदृष्टीचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक कथेतून येतो. आशयाला समृध्द करणारे तपशिल आणि आशयानुरूप स्वतंत्र शैली यामुळे त्यांची प्रत्येक कथा स्वतंत्र गुणवत्ता धारण करते. रूढ साचेबंद कथेचा तोंडवळा बाजूस सारून एकसुरी आशयसूत्रातून मराठी कथेला मुक्त करण्याचे श्रेय पठारे यांच्या कथेला द्यावे लागते. या संग्रहातील मजहबची वस्ती, घडण यासारख्या कथा मराठीतील श्रेष्ठ कथांत समाविष्ट कराव्या लागतील. रूढ कथन परंपरेच्या कक्षा विस्तारित करून स्वतंत्र प्रयोगशीलताप्राप्त पठारे यांच्या कथा मराठी कथेला अधिक सक्षम करणाऱ्या आहेत हे आवर्जून नोंदविले पाहिजे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो — highlight ईश्वर मृतात्म्यास शांती देवो — highlight ईश्वर मृतात्म्यास शांती देवो — highlight ईश्वर मृतात्म्यास शांती देवो — highlight ईश्वर मृतात्म्यास शांती देवो — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like