या पुस्तकाविषयी
पाणी हे सर्वच सजीव सृष्टीचा मूलाधार आहे. पाण्यामुळेच सर्व जीवांची उत्पत्ती झालेली आहे. प्राचीन काळापासून आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्याचे अनेकवेळा प्रयत्न झालेले आहेत. मौर्यकाळ, यादवकाळ, संतकाळ, शिवकाळ, पेशवेकाळ, ब्रिटिश राजवट, व स्वातंत्र्योत्तर काळ या सर्वच कालखंडांमध्ये पाणी प्रश्नाविषयी मंचन झालेले आहे. राजे, संत, राजकीय नेते, समाजसुधारक, जल अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी, विचारवंत व साहित्यिक यांनी जलवापर व जलसंवर्धनाचे अनेक सुधारणात्मक मार्ग अवलंबलेले दिसून येतात. दुष्काळामुळे जनजीवन व प्राणिजीवन ज्या ज्या वेळी संकटात आले. त्या त्या वेळी विविध काळातील जलतज्ज्ञांनी ज्ञानाच्या व विज्ञानाच्या साहाय्याने त्यावर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जलनीतीचा सुरूवातीपासूनचा प्रवास 'जलनीतीचे अंतरंग' या ग्रंथात प्रा.डॉ. किसन माने यांनी नेमकेपणाने शब्दांकित केलेला आहे. मानवी जीवनाचा इतिहास आणि विकास हा जलनीतीच्या अंगानेच झालेला आहे, आणि होत आहे. महाराष्ट्रासह देशभरातील जलसिंचन व जलव्यवस्थापन याची पुन्हा नव्याने मांडणी करावी लागेल, या जाणिवेने पाणी चळवळींचा जन्म झाला. नागनाथअण्णा नायकवडी, गणपतराव देशमुख, बाळासाहेब विखे-पाटील व डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पाणी चळवळीला लोकलढ्याचे स्वरूप देऊन सर्व स्तरांबर जनजागृती केली. शासन, व्यक्ती व संस्थात्मक पातळीबर आज देशभरात जलनीतीवर प्रभावी व योजनाबद्ध कार्य चालू आहे. याचा लेखाजोखा अभ्यास व संशोधनाच्या अंगाने 'जलनीतीचे अंतरंग' या ग्रंथात किसन माने यांनी उत्तमरितीने मांडला आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येचा पुढील साधारण पन्नास एक वर्षांचा विचार करून पाणी समस्यांचा आराखडा तयार करावा लागेल. भविष्यात महाराष्ट्रात पाणीप्रश्नाचे नियोजन करताना जलनीतीचा अभ्यास करणाऱ्या जलतज्ज्ञ, संशोधक, नेते, अधिकारी, समाजसेवक व शेतकरी यांना 'जलनीतीचे अंतरंग' हा ग्रंथ नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. - डॉ. भारत पाटणकर थोर विचारवंत
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.