या पुस्तकाविषयी
आसाराम लोमटे यांच्या कथा ग्रामीण जीवनानुभवातून साकारलेल्या असून अनेक लहान लहान तपशिलांसह कथात्म रंगरूप घेतात. त्यांचे निवेदक पात्रांच्या दृष्टिकोनातून या कथांतील विविध घटकांची विशिष्ट रीतीने संघटना करीत पात्रांवर, त्यांच्या उक्तिकृतींवर भाष्य करतात आणि सामान्य माणसांच्या दुःखाची कारणमीमांसादेखील करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण माणसांचे विविध प्रश्न, त्यांचे व्यामिश्र भावविश्व वाचकांपर्यंत सकस भाषाशैलीतून पोहचवितात. विशेषतः आजच्या संगणकीय आणि प्रगतशील युगात खेड्यातील राजकीय दूषित वातावरण आणि तेथील दबावतंत्राला बळी पडलेले शेतकरी यांचे निवेदन कथांमधून साकारते. तसेच प्रस्तुत कथांमधील निवेदक ग्रामीणस्तरीय जातिभेद, शोषणयंत्रणा, राजकारणातील षड्यंत्र व पुरुषी व्यवस्था याचे प्रकर्षाने दर्शन घडवितो.
आसाराम लोमटे यांनी ग्रामीण परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बदल चिंतनाच्या पातळीवर आणून वास्तवसदृश लेखन या कथावस्तूतून केलेले आहे. ग्रामीण माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्याची मानसिकता, ग्रामीण पातळीवरील राजकीय खेळी यांचे सखोल चिंतन त्यांच्या कथांतून शब्दबद्ध झाले आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.