अक्षरलिपी

Aksharlipi

लेखक Dr. Chandrakant Potdar
प्रकाशक
Lalit Publication
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
१३६
ISBN
9788195626472
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

अक्षर म्हणजे अविनाशी किंवा अपरिवर्तनशील. अशी लिपी लाभलेल्या मराठी वाङ्मयक्षेत्रातील निवडक वाङ्मयप्रकारांच्या साहित्यकृतींचा मोकळा रसास्वाद या पुस्तकात आहे; ज्यातून सर्वकष रसिकवृत्ती दिसते. यातून हेही लक्षात येते की, चंद्रकांत पोतदार यांनी कुठल्याही इझमला बांधून घेतलेलं नाही. अध्यात्मभानाच्या साहित्यकृतीचं त्यांना वावर्ड नाहीय की सामाजिक भानाच्या, ग्रामीभानाच्या साहित्यकृतीचंही वावडं नाहीय. अलीकडे तुच्छतावादी दृष्टिकोन फोफावला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ पाहता यात तुकारामांबरोबर गदिमा आहेत तसे इंदिरा संत, ग्रेस ते थेट गिरीश कर्नाडही आहेत. तुकारामांचा कवी म्हणून विचार करताना प्रपंच, अध्यात्म, प्रबोधन हे तीन आयाम, गदिमांच्या गीतांमधले दार्शनिक अलौकिकत्व, इंदिरा संतांच्या कवितेवरील लेखाचे शीर्षकच सारं काही बोलून जातं, दुःखाचा खोपा विणणारी कवयित्री. कृ. ब. निकुंब या अलक्षित कवीचा समावेश म्हणजे निकुंबांच्या संपन्न काव्यात्मक आणि जीवनव्यापी चिंतनाला (समस्त मराठी साहित्यरसिकांच्या वतीनं) केलेला सलाम आहे. ग्रेसच्या कवितेतील दुःखाचे वैभव महत्त्वाचे आहे. कविता, जागतिकीकरण, ग्रामजीवन, मातृप्रतिमा, श्रमिक शेतकरी याबरोबर गिरीश कर्नाड यांचे नाट्यलेखन अशा आशयविषयांचा समावेश यात आहे. अशी चौफेर पसरलेली सखोल रसिकवृत्ती पाहून चकित व्हायला होतं, कारण या सर्व लेखनाला स्वतःच्या जीवनजाणिवांचा भक्कम पाया आहे. स्वतःच्या आकलनाला महत्त्व दिल्यामुळे हे सर्व लेखन निव्वळ अकादमिक स्वरूपात गणलं जाऊ शकणार नाही. या अवघ्या लेखनाला चंद्रकांत पोतदार यांच्या जगण्याचे आयामही भिडतात आणि त्यातून निर्माण होणारी ठिणगी आपल्या मनात वैश्विक आशयाचा प्रकाश पसरवण्यास कारणीभूत ठरते. 'अक्षरलिपी' म्हणजे सच्ची आणि प्रामाणिक अशी सुहृदगाथा आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like