या पुस्तकाविषयी
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेली क्लिओपात्रा हे यच्चयावत विश्वातील अनवट, गुढ आणि अपरिमित सुंदर पण तेवढेच महत्वाकांक्षी आणि धुर्त व्यक्तिमत्व. तिच्या सौंदर्याचा मोहपाशात तिने तत्कालीन जगातील बलाढ्य सत्ताधिशांना ओढले. ज्यामधे ग्रीकांचा महान सेनापती पॉम्पी द ग्रेट, महान सम्राट ज्युलियस सीझरपासून ते त्याचा उत्तराधिकारी मार्क ऍन्टेनिओ यांचा वापर करून घेत इजिप्तची सम्राज्ञी तर बनलीच पण ज्या रोमन साम्राज्याच्या पाठबळावर ती सम्राज्ञी बनली ते साम्राज्यही आपल्या पंखाखाली आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी तिला तिच्या जीवाची अनेकदा बाजी लावावी लागली... विजनवासही भोगावा लागला. अगणित शोकांतिका, विश्वासघातही पचवावे लागले.
क्लिओपात्राच्या जीवनावरील ही कादंबरी वाचकांच्यासाठी अत्यंत देखण्या स्वरुपात भेटीस येत आहे..
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.