देशीवाद

Deshiwad

प्रकाशक
Rohan Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२५
पृष्ठे
१५३
ISBN
9789348521774
भाषा
मराठी

₹२६०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

१९८३ साली रा. भालचंद्र नेमाडेंनी 'वाङ्‌मयातील देशीयता' या निबंधाची मांडणी केल्यानंतर आजपावेतो देशीवादावर मोठ्या प्रमाणात उलटसुलट बरीच चर्चा झाली आहे. बहुतांश वेळा ही चर्चा नकारात्मक आणि प्रतिक्रियात्मक झालेली दिसते. स्वातंत्र्योत्तर काळापासून एतद्देशीय अकादमिक समीक्षा ही पश्चिमधार्जिणी राहिल्यामुळे बहुतांश आक्षेप त्याच छायेखाली झाल्याचं दिसतं. देशीवादाला कुणी पाश्चात्त्यविरोधी, कुणी पुरोगामी, तर कुणी प्रतिगामी ठरवून आपापल्या मापदंडांनुसार समीक्षकांनी त्याचे आकलन करून घेतले. मराठी भाषेतील समीक्षक देशीवादाबाबत साशंक राहिल्याचे दिसले, तरी देशपातळीवरील परिसंवाद, वाद-चर्चा, व्याख्याने, वाङ्मयीन नियतकालिके आणि समीक्षक यांनी देशीवादाचे स्वागतच केल्याचे दिसून येते.

म्हणूनच मराठी साहित्य-संस्कृतीत नेहमी हिरिरीने चर्चिला गेलेला नेमाडेंचा देशीवादाचा मूळ विचार जिज्ञासू मराठी वाचकांना आणि अभ्यासकांना आकळून घेता यावा, या हेतूने केलेलं त्यांच्या निबंधांचं भाषांतर म्हणजे हे पुस्तक, जे साहित्य आणि समीक्षा यांच्या पलीकडे जाऊन संस्कृतीच्या विविध अंगांना स्पर्श करतं.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे | Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे हे मराठी कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि अभ्यासक असून मराठी साहित्यातील देशीवादी वळणाशी सर्वांत जवळून जोडलेले लेखक आहेत. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सांगवी येथे महानुभाव आणि वारकरी परंपरेच्या एका खेडूत कुटुंबात झाला. १९५५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर ते पुण्याला गे…

संपूर्ण परिचय पाहा
More by Bhalchandra Nemade

भालचंद्र नेमाडे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like