या पुस्तकाविषयी
एक वजा क्षण ही कथा वयाला समजून घेणारी आहे. वयाला शहाणा स्पर्श झाला की प्रसंग म्हणजे नियती नव्हे हे नवे भान त्याला येते. वेदनेच्या प्रदेशात भटकूनही वय तटस्थ राहतं, असुरक्षिततेला सामोरं जातं, उन्मळून पडले तरी उमलण्याचा प्रवास करायला उत्सुक असलेल्या वयाची ही कथा आहे. ही नात्याचीही कहाणी आहे. नात्याला एक देह असतो, आणि त्या देहाला 'ओली माती तिच्या हजार गती'; या अशाश्वततेचा संसर्ग असतो. ते बरेचदा नासतं, लोपतं, तसं कोपतंही. ते कुरुप आणि विद्रुप बनतं. नात्याचं निरंतरपण जाणवूनही ते दिर्घायु व्हावं, किंवा अल्पायुषी ठरावं असं माणसाला वाटतं. या कथांमधील माणसं एकटेपणाच्या सावलीचा शोध घेत राहतात. या शोधाची स्वतःच्या ओळखीशी निगडीत प्रश्नांची ही कथा. ती तरुण आहे. शैलीचा सोस तिला नाही. व्यक्त न होऊ शकणारा एक वजा क्षण समजूतीने सांगताना व्यक्तीमनाच्या विश्लेषणातून उलगडत जाणारी ही कथा.....
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये
काही पाने वाचा
पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
कात्रण
‘एक वजा क्षण’—स्त्रीजीवन, नातेसंबंध आणि एकाकीपणाचा संवेदनशील वेध
वृन्दा भार्गवे यांच्या आणि शब्दालय प्रकाशित ‘एक वजा क्षण’ कथासंग्रहात स्त्रीजीवन, बदलते नातेसंबंध, आत्मसन्मान, भावनिक संघर्ष आणि…
महाराष्ट्र टाइम्स
कात्रण
‘एक वजा क्षण’—एकाकीपणातून आलेल्या शहाणपणाचा कथासंग्रह
वृंदा भार्गवे यांच्या शब्दालय प्रकाशित ‘एक वजा क्षण’ कथासंग्रहात आधुनिक जीवनातील एकाकीपणा, बदलते स्त्री-पुरुष संबंध, मध्यमवर्गीय…