तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण

Tivrakomal Dukkache Prakaran

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०००
पृष्ठे
१३६
ISBN
9788194417682
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

Tivrakomal Dukkache Prakaran | तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण निवेदन हा कथेचा आत्मा. किंबहुना कथेला गोष्ट म्हटले तर निवेदक हे त्यातले मध्यवर्ती पात्र. या संग्रहातल्या कथांतील निवेदनशैलीचे वेगवेगळे प्रयोग मराठी साहित्यात आपल्या परीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि सांगण्याच्या शैलीमधल्या 'अद्भूता'ला गवसणी घालणारे आहेत. समकालीन अनुभव व आशय व्यक्त करण्यासाठी मध्ययुगीन व प्रसंगी त्यापेक्षाही जुनी मराठी भाषा रंगनाथ पठारे यांनी या कथांत वापरलेली आहे. त्यामुळे स्वभावत:च सरळ आशय तिरकस होऊन प्रकटतो व जगण्यातल्या सत्याचे एका वेगळ्या आलोकातून दर्शन घडवतो. जगण्याच्या वर्तमानाचा गुंता; त्याचे दाब, त्याचा वेग आकळण्याची आकांक्षा बाळगत एका अंगभूत वेगळ्या शैलीने या कथा प्रकट झालेल्या आहेत व म्हणूनच त्या अनन्यसाधारण अशा आहेत.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण — highlight तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण — highlight तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण — highlight तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण — highlight तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like