गाभ्यातील प्रकाश

Gabhyatil Prakash

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
भाषा
मराठी

₹३७०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

स्त्री, तिचं दुःख, निमूटपणे सारं सोसणं, विशाल करुणा हा रंगनाथ पठारे यांच्या कथालेखनप्रकृतीचा एक प्रमुख विषय आहे. त्याशिवाय भोवतालच्या सामाजिक जीवनाचं त्यांना चांगलं भान आहे, आणि त्यांच्या लेखनात ही पक्व सामाजिक जाणीवही व्यक्त झालेली आहे. 'गाभ्यातील प्रकाश' या कथासंग्रहातून ही सर्वच वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात. या संग्रहातील 'दुसरी निष्पत्ती' या कथेतून मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यात स्त्रीवर पुरुषांनी गुलामगिरी कशी लादली याचं प्रत्ययकारी दर्शन ते घडवतात. 'पाषाणातील वीज' या कथेतून प्रौढ, एकाकी स्त्रीच्या वेदनेचा ते वेध घेतात; तर 'गाभ्यातील प्रकाश' या कथेतून स्त्री-पुरुषनात्याचा शोध पठारे एका वेगळ्याच पातळीवरून घेतात. त्यांच्या या संग्रहातील कथांमध्ये काही सूत्रे मूलभूत आहेत. आत्मशोध आणि जीवनमूल्यांची जाणीव पठारे यांच्या सर्वच लेखनातून आढळत असल्याने हे लेखन उपरं, वरवरचं वाटत नाही. त्यामुळे 'गाभ्यातील प्रकाश' हा कथासंग्रह ही रंगनाथ पठारे यांच्या वाङ्मयीन वाटचालीतील लक्षणीय भर आहे, हे निश्चित. - सु. रा. चुनेकर
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like