या पुस्तकाविषयी
निसर्ग आणि माणसाचं कधीच न तुटणारं, नाव नसलेलं नातं आहे. एखाद्या अदृश्य तंतूने माणसाच्या मानसिकतेशी जोडलेलं आहे. पाण्यावर वर-खाली होणाऱ्या पानाचा छोट्या-मोठ्या लाटेशी जसा संबंध तसंच. या मानसिकतेमुळे उगवतीचा उत्साह, प्रेम नकळताच जाणवावं, तशी संध्याकाळी सोबतीची आसही जाणवते. अंगीभूतच असल्यासारखी. आजच्या जगात यंत्र होऊन जगताना मध्येच कधीतरी हा नात्याचा तंतू रुणझुणतो. अपेक्षा, ध्येयासक्ती, महत्त्वाकांक्षा, राजकारणं, व्यवहाराच्या नावाखालची छोटी, क्षुल्लक कारस्थानं या सगळ्यांतूनही माणसाला शांतता, सहृदयता आणि प्रेमाची आसक्ती असतेच. माणूस मग या निसर्गाशी जोडलेल्या झंकारणाऱ्या तारेवरून निसर्गाकडे तर जातोच, पण कधी एकदम स्वतःत डोकावतो. वैश्विक होतो. निसर्ग आणि माणसाचा हा अनुबंध डॉ. छाया महाजन यांच्या या ललित लेखांतून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.