गाव विकणे आहे

Gav Vikane Aahe

लेखक Laxmikant Deshmukh
प्रकाशक
Lokvangmaya Griha
प्रकाशन वर्ष
२०१८
पृष्ठे
१७७
ISBN
9789382906193
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आजचं आपल्या देशाचं वर्तमान धगधगतं आहे कारण एका बाजूला मूठभरांची अफाट श्रीमंती व विकृतीच्या टोकापर्यंतचा भोगवाद तर दुसऱ्या बाजूला मोठ्या जनसमूहाची भूक, गरिबी आणि बेकारी. देशाने स्वीकारलेल्या कुरुप बाजारप्रणीत विकासनीतीमुळे इथला तरुण अस्वस्थ आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि स्त्रीचं विक्रय होणारं वस्तुकरण झालं आहे. या अशा आजच्या विपरीत वर्तमानाचा एक्सरे रिपोर्ट लक्ष्मीकांत देशमुखांनी 'गाव विकणे आहे' या संग्रहातील कथांमधून वाचकांपुढे निर्दय सहानुभूतीने प्रस्तुत केला आहे. दुष्काळामुळे सबंध गाव विकण्यामागची मजबुरी, नक्सली जीवनाचे अंतरंग, गाव-शिवाराला आलेली अवकळा आणि असंवेदनशील प्रशासन यांमुळे सामान्य माणसाचे असह्य झालेले जगणे या साऱ्यांचा लक्ष्मीकांत देशमुखांनी भेदकपणे या सर्वच कथांमधून वेध घेतला आहे. जागतिकीकरणाचे भलेबुरे परिणाम मानवी संवादशीलतेने समजून जर घ्यायचे असतील तर हा कथासंग्रह वाचला पाहिजे. साहित्यलेखन प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर देशमुखांची लेखणी वर्तमानाशी नाते जोडत 'नाहींरे' वर्गाच्या दुःख-वेदनेचा स्वर कशी बनते याचा अनुभव या कथा देतात आणि मानवमुक्तीचा उद्घोष करीत संघर्ष करीत जगणाऱ्या सामान्य माणसाला बळ देतात.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like