माझं क्षितिज

Maze Kshitij

लेखक Dr. Nitin Dattatreya Arekar
प्रकाशक
Dimple Publication
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
१४९
ISBN
978-93-92419-23-2
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

डॉ. नीतिन आरेकर हे माझे जुने मित्र आहेत, खरं तर ते आमच्या कुटुंबाचाच एक घटक आहेत.

एक उत्तम प्राध्यापक, उत्तम संयोजक आणि महत्त्वाचे म्हणजे ते उत्तम लेखक आहेत. विशेषतः शब्दांकनकार !

माझ्यासाठी त्यांनी दोनवेळा विस्तृतपणे लिहिलंय. एकदा 'लोकसत्ते'त व एकदा 'ऋतुरंग 'मध्ये. ते जेव्हा शब्दांकन करतात, तेव्हा ते त्या लिखाणात पदरचं काही घालत नाहीत, असा माझा अनुभव आहे. त्यांनी विषयाला अनुसरून अनेक गोष्टी माझ्याकडून काढून घेतल्या व त्यांचं शब्दांकन करताना असं लिहिलं की जणू मीच बोलतो आहे. आम्ही गायक मंडळी जेव्हा चित्रपटासाठी गातो तेव्हा रसिकाला वाटत असतं की तो अभिनेता वा अभिनेत्री गात आहे, तसंच डॉ. आरेकर यांच्या शब्दांकनांचं आहे. ते लिहितात तेव्हा त्या व्यक्तीसाठी ते शब्दांकन करत असतात, ती व्यक्तीच लिहिते आहे असं वाटतं. ते रंजकतेने, वाचकांची उत्सुकता कायम राहील असं लिहितात.

'माझं क्षितिज' या पुस्तकात त्यांनी 'ऋतुरंग' या प्रसिद्ध दिवाळी अंकात लिहिलेली सुरेख शब्दांकनं एकत्र आली आहेत. यात त्यांनी उस्ताद झाकीर भाई, बेगम परवीन सुलतानाजी, तालवाद्य वादक तौफिक भाई, जॉनी लिव्हरजी, मनोज जोशीजी व माझ्याकरता वेगवेगळे विषय निवडून केलेली शब्दांकनं तर आहेतच पण त्यांनी आपल्या आई व आजीची रंगवलेली शब्दचित्रेही आहेत.

मला त्यांचं लिखाण आवडतं तसंच तुम्हालाही ते आवडेल असा विश्वास वाटतो. नीतिनजींना व या पुस्तकाला आमच्या मनापासून शुभेच्छा !

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like