या पुस्तकाविषयी
सृजनाची अनेक रूपे एकाच व्यक्तिमत्त्वात एकवटलेली असा अनुभव देणारी माणसे फार दुर्मीळ असतात. त्यात ही परिस्थिती आणि प्रत्यक्ष जगण्यातील विरोधाभास ठळक असतानाही, केवळ सृजनाच्या बळावर आयुष्य यशस्वी करणारी माणसे आणखीनच दुर्मीळ असतात या माणसांमध्ये सरोजिनी बाबरांचा समावेश करावयाला हवा यात शंका नाही. जीवनाला समृद्ध करणाऱ्या पाच गोष्टी असतात. ज्ञानसाधना, समाजसाधना, मूल्यसाधना, साहित्यसाधना आणि आत्मसाधना या त्या पाच गोष्टी होत. या पाचही बाबी सरोजिनी बाबर यांच्या जीवनात एकरूप झालेल्या होत्या. लोकसाहित्याचे महत्त्व ओळखणे, त्या साहित्याचे सर्वांगीण संकलन करणे, त्यातून लोकसंस्कृतीची ओळख करून देणे, या संस्कृतीमधील स्त्रियांचे योगदान यावर भर देणे आणि जीवनाला उन्नत नि विशुद्ध बनवणाऱ्या चिरंतन मूल्यांची थोरवी सूचित करणे आणि भारतीय संस्कृतीविषयी असणारा जातिवंत जिव्हाळा यांचे दिपवून टाकणारे सगुण रूप म्हणजे सरोजिनी बाबर होत. डॉ. द. ता. भोसले
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.