या पुस्तकाविषयी
देव ही जगातील सर्वात जास्त पवित्र आणि मनमोहक अंधश्रद्धा आहे. जगातल्या, अन्ये सर्व अंधश्रद्धांची ती जनक व जननी आहे आणि धर्म हे माणसाच्या समाधानासाठी शोधून काढण्यात आलेलं तत्त्वज्ञान आहे, जे आज त्याच्याच मुळावर उठलं आहे; पण ही चूक़ ना देवाची आहे, ना धर्माची, चूक आहे ती माणसांची. स्वतःचं व इतरांचंही माणूसपण नाकारून जगणाऱ्या माणसांनी सहज सुंदर जगणं विखारी करून टाकलंय. इतकं विखारी की, हे.. विष आता त्याच्या नसानसांतून वाहत पुढच्या पिढ्यांमध्येही उतरू लागलं आहे. त्यांना मृत्यूची भीती नाही. प्रेम त्यांना शांतवू शकत नाही. आणि जी श्रद्धा त्यांना चांगल्या जगण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, उत्पन्न झाली होती, तीच आता त्यांचं सैतानांमध्ये रूपांतर करीत आहे. आपण काही न करता याविरुद्ध अजूनही शांत बसून राहिलो, तर आपल्यासह येणाऱ्या पिढ्यांच्या सर्वनाशाचा लेख आपणच साक्षांकित करून ठेवू.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
प्रतिक पुरी यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.