या पुस्तकाविषयी
प्रिय डॉक्टर, आपल्या अंतरंगातले विचार आणि विकार, हर्ष आणि विमर्ष, प्रेम आणि द्वेष, सुख आणि दुःख, श्रीमंती आणि गरिबी, यश आणि अपयश, वीरता आणि भीरुता, जीवन आणि मृत्यू... या साऱ्याकडं आपण पुनःपुन्हा पाहावं आणि त्यातलं सत्य काय ते जाणून घेण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करावा, अशी प्रेरणाच आपलं लेखन देतं. अशी प्रेरकशक्ती असणारं अत्यंत सखोल आणि मर्मभेदी लेखन अगदी साध्या, सोप्या शब्दांत करता येतं, हे आपण सप्रमाण दाखवून दिलं आहे. कोणतंही अवडंबर न माजवता आणि स्वकेंद्रित न होता केलेलं हे लेखन एखाद्या उत्स्फूर्त अशा प्रासादिक काव्यासारखंच झालं आहे. असं काव्य जे पुनःपुन्हा वाचावंसं वाटतं. त्या वाचनानं मन पवित्र होतं. त्या अनाम आणि अरूप जगन्नियंत्यापुढं नम्र होतं. स्वतःला अधिकाधिक सन्मार्गावरून चालण्याची शक्ती देतं...
मातीचं कवच भेदून हिरवा लसलसता अंकुर सहज जोमानं आकाशाकडं झेपाव... अगदी त्याच सहजतेनं आपलं हे लेखन झालं आहे. त्याला सलाम!
- श्रीराम सिधये
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
Dr. Vrushali Kinhalkar यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.