या पुस्तकाविषयी
कविता हा साहित्याचा सौंदर्यपूर्ण आविष्कार ! सुंदर तितकाच अवघड प्रकार, कविता म्हणजे मनावरची जाळ्याजळमट दूर करणारी, भावना समृद्ध करणारी, शल्ये बोथट करणारी, जीवनात प्रसन्नतेनचे चांदणे फुलवणारी! कवीच्या सुक्ष्म, वास्तव चिंतनातून कविता फुलते. अनुभवसिद्ध जीवन जगलेला कवीच भावनांचे इंद्रधनू शब्दातून मांडू शकतो. सारी सृष्टी म्हणजे सृजनाचा मळा ! सृजनाचे नवनवे आविष्कार निसर्ग दाखवत असतो. मनात सृजनाची फुलबाग फुलवत असतो. सगळे गहिरे रंग त्यात येतात. कविता म्हणजे फक्त वेदना नसते. जीवनाचे सगळे रंग त्यात येतात. जगणं बेरंग होऊ देत नाही. उलटपक्षी जीवनाकडे स्वागतशीलतेने पाहायला भाग पाडते. प्रा. द. के. गंधारे ग्रामीण मातीतले. तिथला भवताल, जगणं, शेतीमाती, निसर्ग, समाज, नातीगोती, हळूवार प्रेमभावना त्यांनी अनुभवल्या त्या शब्दातून जिवंत केल्या. 'आभाळाची आस. नाहीतर गळ्याला फास' पावसावर आधारीत शेती, बेभरवशाचा पाऊस, तुकड्यात विभागलेली जमीन, आर्थिक ओढाताण, प्रचंड कष्ट असं जीवन जगणारा आमचा साठ टक्के शेतकरी, कष्टकरी समाज; त्याचं जीणं काळ्या आईवर प्रेम करणारा कवीच समजून घेऊ शकतो. प्रा. द. के. गंधारे यांच्या कविता वास्तव जीवनाच्या सशक्त मुशीतून तावून सुलाखून निघाल्यात. वाचक या कवितासंग्रहाचे मनभरून स्वागत करतील. कवी म्हणून जगणं सोपं नसतं. कवितेलाच शब्द द्यावा लागतो, आयुष्यभर तिच्याचकडे गहाण राहण्याचा... तेव्हा कुठे ती प्रसन्न होते. प्रा. द. के, गंधारे यांना ती प्रसन्न होवो अशी अपेक्षा व्यक्त करते ! सुनिताराजे पवार कोषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळ
पुस्तकाची छायाचित्रे
प्रा. डॉ. द. के. गंधारे यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.