विटाळ

Vital

लेखक Daya Pawar
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
१९८३
पृष्ठे
७२
ISBN
9788177661415
भाषा
मराठी

₹१५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

तो घराचा दरवाजा लोटतो. नेहमीसारखीच कडी लावलेली नसते. तो अंधारात बघतो. अंथरुणावर मुलं अस्ताव्यस्त झोपलेली असतात. बटण लावण्याचे त्याच्या जिवावर येते. तो अंधारात कपडे बदलतो. बायकोकडे तो पाहतो. एका कुशीवर ती झोपलेली असते. अंधारातही त्याची नजर तिच्या आकृतीवर खिळते. तो बायकोच्या पांघरुणात घुसतो. गाढझोपलेली त्याची बायको स्पर्शाने जागी होते. दहा वर्षांचा परिचयाचा स्पर्श ती सहज ओळखते. ती गळ्यात हात टाकीत कुजबुजते, 'वीस रुपये आणलेत ?' बायकोच्या प्रश्नाने त्याची नशा खाडकन् उतरते. एखाद्या धंदेवाल्या बाईने प्रश्न विचारावा, तसे त्याला वाटते. त्याची सारी गात्रे बर्फासारखी थंडगार पडतात. शरीराचे मुटकुळे करून तो बाजूला जाऊन पडतो. गर्भाशयात मूल झोपावं, तसा तो दिसत असतो.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

More by Daya Pawar

Daya Pawar यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like