या पुस्तकाविषयी
संजय कृष्णाजी पाटील यांच्या प्रस्तुत संग्रहात आणखी एक वेगळेपण जाणवते ते हे की मराठीची समग्र कविपरंपरा त्यांनी मनापासून अभ्यासली आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचे बहुसंख्य बाज, ते गतिमानतेने आणि लीलया हाताळतात. संजय पाटील यांची कविता एका झेपेत सगळ्या वर्गीकरणाला कवेत घेणारी कविता आहे. ती ग्रामीण आहे. ती दलित आहे. ती धर्मातीत आहे. ती महानगरीय आहे. ती महाराष्ट्राच्या पीळदार मातीची आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष रीतीची आधुनिकच नव्हे, तर अत्याधुनिक अशी अनोखी कविता आहे. वेश्यावस्तीचे नागडेपण ती मांडते आणि मुंबईनगरीचे विचित्रक आवेगाने मांडते. मानवीमनाचे एकाकीपण व अगतिकता, मृत्यूचे तांडव आणि बेपर्वाई, प्रचंड वैभव आणि शरीरविक्रय, अपत्य आणि संसारप्रेम आणि विदारक कौर्य यांच्या बेचक्यात अडकलेल्या मनाला, पाटील यांच्यातील प्रगल्भकलावंताने साद घालून, बास्तव, बीभत्स आणि सर्व रसात्मकतेला शब्दबद्ध केले आहे. मानवाबद्दलची ही बांधिलकी, मर्डेकर, कोलटकर, सुर्वे ढसाळ यांच्या तोडीची आहे. त्यामुळेच संजय कृष्णाजी पाटील यांची 'लेझीम खेळणारी पोरं रसिकमनात प्रदीर्घ काळापर्यंत निर्भातपणे नाचत राहतील, ह्याबद्दल शंकाच नको. डॉ. केशव मेश्राम
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
संजय कृष्णाजी पाटील यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.