माझं साहित्यिक खटलं

Majha Sahityik Khatla

लेखक Adv Yashwant Hadap
प्रकाशक
Granthali Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१३
पृष्ठे
१९९
भाषा
मराठी

₹२२५

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

१९२० ते १९४० या काळात आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमुळे वाङ्ङ्गमयेतिहासात मानाचे पान मिळवणाऱ्या वि.वा. हडप यांचे यशवंत विठ्ठल हे ज्येष्ठ चिरंजीव. वडिलांमुळे त्या काळातील प्रसिद्ध साहित्यिकांची घरात होणारी ऊठबस त्यांनी पाहिली होती. बऱ्याच लेखकांशी त्यांचा स्नेह जुळला एवढेच नव्हे तर खासगी आयुष्यातील सुख-दुःखाशीही ते समरस झाले. याचा परिपाक म्हणून यशवंत हडप यांनी वेळोवेळी हे लेख लिहिले.

मी, अभिजित यशवंत, जेव्हा माझ्या वडिलांच्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा अवाक् होतो. त्या काळात शिक्षकाची नोकरी सोडून भागलपूरला जाणे, तीन वर्षांचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करून एलएल.वी. ची पदवी मिळवणे, नाशिकला परत आल्यावर सर्व हितचिंतकांचे सल्ले न मानता स्वतंत्र वकिली सुरू करणे व त्यात यशस्वी होणे हे सर्व त्यांच्या जिद्दीमुळेच शक्य झाले असे मी मानतो.

वकिलीसारखा रुक्ष व्यवसाय करतानासुद्धा त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती, नव्हे त्यांनी ती तशी जोपासली होती.

मला आठवते, एकदा एका प्रथितयश वकिलाचा मुलगा त्यांच्याविरुद्ध केस लढवत होता. त्याच्या उद्धटपणावर टीका न करता बाबा फक्त एवढेच म्हणाले, "मला खात्री आहे की आपला स्वभाव आपल्याला वारसाहक्काने मिळालेला नाही."

मी देव मानत नाही, पण ज्या कोणी आदिम शक्तीमुळे पृथ्वीची जडणघडण झाली व होते आहे तिच्या पायाशी एकच प्रार्थना, मला व माझ्या धाकट्या भावाला वडिलांची जिद्द, विनोदबुद्धी, कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमता व सर्जनशीलता वारसाहक्काने मिळालेली असो.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like