या पुस्तकाविषयी
स्त्री-पुरुष नातेसंबंध हा अत्यंत गुंतागुंतीचा व अनेक मिती असलेला विषय आहे. तो जसा मनोरम, आनंदी व प्रेम-समर्पण-विश्वासाच्या तीन रंगांनी मानवी जीवन समृद्ध करणारा आहे, तसाच तो विरह, प्रेमभंग, फसवणूक, विश्वासघात, व्यभिचार आणि पुरुषी वर्चस्वाच्या प्रबळ मानसिकतेविरुद्ध आत्मभान आलेल्या स्त्रीची गुलामी न स्विकारता प्रेमात समानतेच्या नात्याची मागणी करण्याची वाढती बंडखोरी या द्वंद्वामुळे काजळलेला, सैल झालेला व विदारक अनुभव देणारी आहे. स्त्री-पुरुष संबंध हा असा अथांग समुद्र आहे की, त्याचा तळ कितीही प्रयत्न केला तरी गवसत नाही. पाऱ्याप्रमाणे काहीतरी निसटून जातंच. म्हणून ललित साहित्यामध्ये यावर सतत लिहिलं जातं, जाणारच. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'मृगतृष्णा' या कथासंग्रहातील वेगळी कथानकं आणि चिंतनगर्भ, आशयसूत्रांनी समृद्ध अशा दहा कथांमधून स्त्री-पुरुष संबंधांचे मराठी साहित्यात अभावानेच आलेले काही पैलू टिपण्यात आले आहेत. प्रेम, सहजीवन, समर्पण, वर्चस्वाचा संघर्ष, मानसिक अबोध कौटुंबिक व्यभिचार (इनसेस्ट), समलिंगी प्रेमाचा निषिद्ध पण तरल नितांत खाजगी अनुभव, सामाजिक, जातीय व धार्मिक घटकांमुळे स्त्री-पुरुष संबंधांमध्ये आलेली विदारकता, भविष्य आणि मृत्यूचे रूपक (मेटॉफर) वापरून प्रेमातली स्त्री-पुरुषांची भिन्न मानसिकता आणि मस्क्युलिनीटीचा शस्त्र म्हणून वापरत स्त्रीला नामोहरम करणं - अशा आशयसूत्रांच्या या कथा वाचकांना कलात्मक वाचनाचा अनुभव देता देता विचारांनाही प्रवृत्त करतील हे नक्की! 'मृगतृष्णा' वाचकांना भाव व विचारसंपन्न करणारा लक्ष्मीकांत देशमुख यांचा ताजा कथासंग्रह !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.