या पुस्तकाविषयी
आजच्या काळात सानेगुरुजींच्या कुळाशी नाते सांगणारे शिक्षक अपवादानेच आढळतात. या कुळाशी नाते सांगणारे एक शिक्षक म्हणजे श्री. उमेश घेवरीकर ! वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पोटच्या मुलाचा चेहरा पाहणारी संवेदनशीलता, कवितेच्या बागेपासून तर शैक्षणिक लघुपट निर्मितीची अनोखी व अनुकरणीय उपक्रमशीलता आणि शिक्षक किती विविधांगी उपक्रमशील असू शकतो हे दर्शवणारे अष्टपैलुत्व याचे मूर्तिमंत प्रतिक. त्यांचा शिक्षणाच्या कविता हा कवितासंग्रह शिक्षण क्षेत्रातील एका संवेदनशील माणसाची होणारी होरपळ व्यक्त करणारा संग्रह आहे. शिक्षकाची भूमिता, मुलांचे भावविश्व ते शालेय परिसरातील सर्व घटक यांना ही कविता स्पर्श करते. प्रश्न सोडवण्यासाठी सर्व घटक यांना ही कविता स्पर्श करते. प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांनी आता कुणावरही अवलंबून न राहता स्वतः मार्ग शोधावे अशी भूमिका ही कविता मांडते. कवी इतरांवर आरोप न करता स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहून न्यायालाने शिक्षा सुनावण्याआधी स्वतःला चार कोरडे मारून घेतो आणि समाजाला शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याचा आग्रह धरतो हे या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. नरेंद्र लांजेवार ग्रंथपाल, बुलडाणा
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.