Description
निवडक नागनाथ कोत्तापल्ले : एक आकलन’ हे पुस्तक अभ्यासकांच्या हाती देताना आनंद होत आहे. ‘विशिष्ट लेखकाचा अभ्यास’ या अभ्यास पत्रिकेसाठी नागनाथ कोत्तापल्ले यांच्या सावित्रीचा निर्णय, गांधारीचे डोळे, साहित्याचा अन्वयार्थ, मूड्स आणि नंतरच्या कविता या साहित्यकृती अभ्यासासाठी आहेत. या साहित्यकृतींच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करावे. अभ्यासाच्या काही दिशा दाखवाव्यात हा हेतू समोर ठेवून या पुस्तकाचा प्रपंच केला आहे.
साठोत्तरी मराठी साहित्यात निर्माण झालेली समाजाभिमुख पुरोगामी जाणीव ही अनेक लेखकांप्रमाणेच कोत्तापल्ले यांच्या लेखनात आली आहे. मानवी जीवनातील माणसांच्या नातेसंबंधांचा, भावजीवनाचा शोध महत्त्वाचा ठरतो, तो शोध लेखक घेत असतो. कोत्तापल्ले यांनी आपल्या विविध कलाकृतीतून तो शोध घेतला आहे. त्यातून त्यांची जीवनसरणी, विचारसरणी स्पष्ट होते. ग्रामीण माणसाचे भावविश्व एका कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून या कलाकृतीतून अवतरले आहे. त्याचा अभ्यास कसा करता येईल या दृष्टीने हा प्रयत्न विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.