मराठी कादंबरी

हारण

Haran

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२१
पृष्ठे
३६६
ISBN
9788194459163
भाषा
मराठी

₹६५०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

...हारण निघाली. पळत निघाली. तीरासारखी निघाली. आता हा ती कुठे जाणार होता आणि कोणत्या रस्त्याला लागणार होता, हे तिला कुठे माहीत होते? तेवढा विचार करायला वेळच कुठे होता ? जिवाच्या कराराने पळत राहणे एवढी एकच एक गोष्ट ती सर्वांगाने करीत होती.... हारणचे पुढे काय होणार ? वेगळे असे तिचे काय होणार आहे ? उद्या कदाचित ती कोणाची आवडती पत्नी होईल, माता होईल. 'स्त्री क्षणकालाची पत्नी व अनंतकालाची माता असते,' ह्या सुभाषितात अभिप्रेत असलेली पूज्य माता होण्याचे ती नाकारील, कारण ती थोडी वेगळी स्त्री आहे. ती एक कणखर, सहजी मोडून न पडणारी स्त्री आहे. चंगीजखानापासून अर्वाचीन अधम, आक्रमक पुरुषांच्या सगळ्या कारवायांना पचवीत राहून स्वतःचे स्वत्व टिकवत राहिलेल्या स्त्रीत्वाचा धागा तिच्यात आलेला आहे. सगळे हलाहल पचवून उभे राहण्याची असाधारण क्षमता व्यापक अर्थाने स्त्रियांत नेहमी असते. एखाद्या क्षणी पाताळात जाण्याची कामना वैतागून तिनं व्यक्त केली असली, तरी ती तिथे जाणार नाही. अंगावर येईल, ते झेलत व त्याखाली चिणले न जाता आपले स्वत्व जपत जगणे व आपल्या अस्तित्वाचे अपरिहार्य उन्मेष प्रकट करीत राहणे यात स्त्रीचे जे सनातन प्रौढ समंजसपण असते, ते तिच्यात आहे.....

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

हारण — highlight हारण — highlight हारण — highlight हारण — highlight हारण — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Rangnath Pathare

रंगनाथ पठारे | Rangnath Pathare

रंगनाथ पठारे हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक असून शब्दालय प्रकाशन हे त्यांचे प्रकाशन आहे. त्यांचा जन्म १९५० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जवळे येथे झाला. छोट्याशा गावातल्या ग्रंथालयातील पुस्तकांनीच त्यांना वाचनाची सवय आणि लेखक होण्याचा निश्चय दिला. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठातून …

संपूर्ण परिचय पाहा
More by Rangnath Pathare

रंगनाथ पठारे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like